Gautami Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: "संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील"

गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपच सामान राऊतांना पाठवून दे भाजप नेत्याची टिका

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सध्या गौतमी पाटील खूप चर्चेत आहे. पण ती आज वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भाजपच्या नेत्याने ठाकरे गटाच्या एका खासदाराला चक्क गौतमीची उपमा दिली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

तर पुढे नितेश राणे म्हणाले की, राऊत यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपच सामान संजय राऊतांना पाठवून दे असं ते म्हणालेत. तर 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले कि, 'आज सकाळी गजानन कीर्तिकरांवर राऊतांचं फार प्रेम ऊतू जात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत, असं राणे म्हणालेत.

गजानन कीर्तिकरांबद्दल अजिबात चिंता करू नका. ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांच्या तावमीत तयार झालेले आहेत. ते संजय राऊतांसारखे नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT