Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत कडाडले! मराठा-ओबीसी वाद हे भाजपचेच कारस्थान; निवडणूक आयोगावर भरोसा नाही, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे भाजपला आव्हान

जाती धर्मात तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपला निवडणुकाच लढता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा नवा मुद्दा शोधला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : राममंदिर पूर्ण झाल्याने व हिंदू मुस्लिम वाद आता जुना झाल्याने भाजपने मराठा-ओबीसी वादाचे कारस्थान सुरू केले आहे. जाती धर्मात तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपला निवडणुकाच लढता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा नवा मुद्दा शोधला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते.

सध्या लोकशाही देशात असून देश व संविधान वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. संविधानाचे रक्षण करणे हेच दोघांचे ध्येय आहे. २०२४ निवडणुकीत दहा वर्षांची हुकूमशाही नष्ट होईल. रावणाची दहा तोंडं नष्ट झाली तशी मोदी-शहा यांची दहा वर्षांची सत्ता येत्या निवडणुकीत नष्ट होणार आहे, असे श्री. राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत केले. यावेळी उपनेत्या आस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, प्रा. लक्ष्मण हाके, निरजंन बोद्धुल यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

एक तरी निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या

इव्हीएम मशिन हॅक करता येते, याचा शोध भाजपनेच लावलेला आहे. आज जगभरातील निवडणुकीत इव्हीएम कालबाह्य ठरविले आहे. बांगला देशाला भारताकडूनच इव्हीएमचा पुरवठा होत असे, आता बांगला देशाने देखील इव्हीएम वापरणे बंद केले आहे. भारतात मोदी शहा यांची सत्ता असेपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. भाजपने देशाच्या कोणत्याही राज्यात अगदी भाजपची सत्ता असलेल्या राज्यातही एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असे आव्हान श्री. राऊत यांनी केले.

निवडणूक आयोगावर विश्वास नाही

आजपर्यंत २७ वेळा मागणी करून देखील बॅलेटपेपरची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावयाचा आहे. मात्र निवडणूक आयोग असा निर्णय घेणार नाही. जो निवडणूक आयोग बाळासाहेबांची शिवसेना आयऱ्यागयऱ्यांना देऊ शकतो. राष्ट्रवादीवरील शरद पवारांचा हक्क नाकारू पाहतो तो निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT