Sanjay Raut Criticized Raj Thackeray e skalal
महाराष्ट्र बातम्या

'सेनेची अयोध्या यात्रा राजकीय नाहीतर...', राऊतांचा राज ठाकरेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या ५ जून रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. शिवसेने कार्यकर्ते देखील अयोध्येला जाणार आहेत. पण आमची राजकीय यात्रा नसून श्रद्धेची यात्रा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना अयोध्येच्या लढ्यात प्रत्यक्ष काम करत होती. आम्ही अयोध्येला जाणार आहोत. अयोध्येला जाण्याची तारीख ठरवू. आमची राजकीय यात्रा नाही.आमची ही श्रद्धेची यात्रा आहे. कोरोना काळात आम्ही अयोध्येला जाऊ शकलो नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि शिवसैनिक आम्ही सर्वजण अयोध्येला जाणार आहोत. नाशिकचे कार्यकर्ते आयोजन करणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपने ओवैसींचा वापर केला. त्याचप्रमाणे भाजपने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही औवेंसी निर्माण केले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण, महाराष्ट्राची जनता अत्यंत जागरूक आणि ज्ञानी आहे, असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी राज ठाकरेंना लगावला. तसेच सध्या दिल्लीत देखील हिंसाचार झाला आहे. त्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली आहे. देशभरातील दंगलीचा हा व्यापक गट आहे. जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पण, आमचं सरकार यांच्या दंगली यशस्वी होऊ देणार नाही, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा केली. त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत, असंही राज ठाकरेंनी आज सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT