esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : पब्लिक डिमांड! शिंदेंच्या 'त्या' कृतीची दखल घ्या; राऊतांचं थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

रोहित कणसे

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज, २० जून रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट पडले. यादरम्यान या बंडाच्या वर्षपूर्तीला २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन जाहीर करा, असं पत्र खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले आहे. राऊतांनी त्यांचं हे पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले आहेत?

मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नेता आहे. मी भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेचा सदस्य आहे. मुंबईतीव ( तेव्हाचे बॉम्बे) मराठी तरूणांच्या हक्कांसाठी हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी १९६० मध्ये सुरू केला होता.

आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत आणि ते २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मागच्या वर्षी २० जूनला आमच्या पक्षातील ४० आमदारांच्या गटाने भाजपसोबत जात बंड केलं. प्रत्येक आमदारांने यासाठी ५० कोटी रुपये घेतले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपने त्यांची सगळी शक्ती पणाला लावली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष १० आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला.

हे सगळं मागच्या वर्षी २० जूनला जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मुंबई सोडून गुजरात गाठलं तेव्हा सुरू झालं. १२ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा या फायदा घेतला.

२१ जून हा दिवस जसा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे २० जून बा जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी मी तुमच्याकडे करतो. जेणे करून या आमदारांची गद्दारी जग लक्षात ठेवेन.

कोश्यारींना देखील लिहीलं पत्र

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक अजब मागणी करणार पत्र लिहिलं आहे.  खोचकपणे लिहिलेल्या यापत्रात दानवेंनी म्हटलं की, "जर गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात 'गद्दार दिवस' साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळं नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपल्या दिल्लीच्या पातशाहांमार्फत संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करावा, मागणी करावी, हे माझे आपणास आवाहन आहे" 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT