महाराष्ट्र बातम्या

ड्रग माफिया, सोनं तस्करांशी संजय राऊतांचा संबंध: मोहित कंबोज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांची उत्तरे दिली आहेत. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावरही अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, माझी कसलीही चौकशी करा, मी तयार आहे. मात्र, ते मला ओळखत नसल्याचं त्यांचं म्हणणं खोटं आहे. ते दरवर्षी माझ्या घरी गणपतीवेळी येतात. गरज भासेल तेंव्हा मी त्यांना मदत म्हणून पैसेही दिले आहेत.

पुढे ते म्हणाले की, मी प्रत्येक आरोपाचे उत्तर देणार आहेत. मियाँ नवाब यांनी आरोप केले आणि त्याला मियाँ जावेद पुढे नेत आहेत. दररोज सकाळी उठून माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. ते मला ओळखत नाहीत, हा त्यांचा दावा चूक आहे, कारण राऊत साहेब माझ्या घरी आले होते. प्रत्येक वर्षी संजय राऊत गणपतीला येतात. अनेकदा पैशांच्या अडचणीवेळी मी त्यांची मदत केली आहे. त्यामुळे ते ओळखत नाहीत असं म्हणणं चूक आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, संजय राऊत यांनी मला फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्यांचा बॉय म्हटलंय. राऊत नेमके कुणाचे आहेत? उद्धव ठाकरेंचे आहेत की शरद पवारांचे आहेत, ते सांगावं. मी किमान माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे.

पुढे ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन केलं मात्र, तो फ्लॉप शो आहे.

माझ्यावरचा पहिला आरोप आहे की, गुरु आशीश यांच्याकडून 12 हजार कोटींची जमीन मी 100 कोटींमध्ये घेतलीय. मात्र, 10 लाख स्क्वेअर फूटने जगात कुठेतरी जमीन मिळतेय का? तुम्ही बारामतीचा हर्बल तंबाखू खाऊन बोलता का? राकेश वधावन यांच्याकडून मी जमीन घेतली त्यात माझे पैसे गुंतले होते आणि त्यात फ्रॉड झाला त्याची तक्रार मी केली. तक्रार करणारा मी पहिला होतो. मी स्वत:चं FIR केला आहे. मी स्वत:चं स्वत:विरुद्ध स्कॅम केला, असं म्हणायचंय का? मी स्वत:चं पीडित आहे. जो तपास करायचा असेल तो करा. मी तयार आहे.

माझा संजय राऊतांना प्रश्न आहे की, प्रवीण राऊत यांच्या फ्रंट मॅनने साम दाम आणि संजय राऊतांची पॉवर वापरुन 175 एकर लँड ताब्यात घेतली आहे. त्याच्या डिलवेळी संजय राऊतही होते. हा संपूर्ण प्रोजेक्ट 5 हजार कोटींचा आहे. त्या संजय राऊतांना किती टक्के मिळाले, हा माझा प्रश्न आहे. तुमचा आणि ग्रँड हयात हॉटेलचा काय संबंध आहे? समगलर लोकांसोबत संजय राऊत यांचा काय संबंध आहेत? यात संजय राऊत यांचा किती कट आहे? संजय राऊत यांनी कॅशमध्ये किती पैसे घेतले? गोल्ड समगलरसोबत तुमचे काय संबंध आहेत? कोविड सेंटरमधील पार्टनरसोबत राऊतांचे काय संबंध आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

SCROLL FOR NEXT