Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ..तेव्हापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला ; राऊतांचा खळबळजनक दावा !

Chinmay Jagtap

Sanjay Raut : ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला,’’ असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात धार्मिक मुद्द्यांवरून दोन समाजांत संघर्ष झाला. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक अशांतता आहे. यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील वातावरण असे कधीच नव्हते.

अस्थिर आणि असुरक्षित जातीपातींमध्ये वाटलेले सध्याचे वातावरण आहे. या सर्वाला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. राज्याला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांनी एकसंध ठेवले. परंतु, गेल्या दहा वर्षांत या परिस्थितीत बदल झाला आहे. जाती-धर्मानुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही धनगरांना आरक्षण देऊ असे सांगत होते. हेच फडणवीस महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार असताना आमची सत्ता आली तर मराठा समाजाला २४ तासांत आरक्षण देऊ, असे सांगत होते. मग फडणवीस आता आरक्षण का देत नाहीत?

- संजय राऊत, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT