sanjay raut may contest lok sabha election 2024 from mumbai north east constituency political news  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : लोकसभेसाठी संजय राऊत मैदानात? मुंबईतील 'या' जागेवरून लढवू शकतात निवडणूक

रोहित कणसे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू आहे. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. राऊत मुंबईच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. संजय राऊत हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला आगामी लोकसभा निवडणूकीत रोखण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. यादरम्यान संजय राऊत हे देखील लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता समोर आली आहे. राऊत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईत सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत.

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींमध्ये गणले जातात. दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्रीपदावरून वेगळे झाले, तेव्हापासून ते भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत.

जून २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आणि पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार उद्धव यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, त्यावेळीही संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे होते. संजय राऊतांनी पक्षात उभी फूट फडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बाजू मोठ्या ताकतीने मांडली आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट पडल्यानंतर राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्यावर देखील सतत टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT