sanjay raut sharad pawar
sanjay raut sharad pawar esakal
महाराष्ट्र

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीचे कारण काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर (silver oak) दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत सपत्नीक पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचे नेमके कारण काय? यावर चर्चा सुरू आहे.

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर

दिवाळीच्या काळात शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत - शरद पवार यांच्यामध्ये बैठक एक चर्चेचा विषय समजला जात आहे. या भेटीचे कारण शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न येत्या काही दिवसात आहे. त्याचे आमंत्रण द्यायला संजय राऊत सपत्नीक गेले असल्याचे समजते. तसेच राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘दो कौडी के लोग’, नेमका कुणाला टोला?

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असतानाच आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उस जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘दो कौडी के लोग’, असा टोला नेमका कोणाला हाणला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इंटरव्हलनंतरची पटकथा संजय राऊत लिहणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणाची इंटरव्हलनंतरची पटकथा मी लिहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले असते. परिणामी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT