eknath shinde nashik esakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदें गटाच्या कार्यालयासमोरून जात होती राऊतांची गाडी; कार्यकर्त्यांनी 'असं' केलं की पोलिसांची... | Sanjay Raut

संतोष कानडे

नाशिकः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकून थुंकण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय. आज नाशिकमध्ये त्यांचा ताफा शिंदे गटाच्या कार्यालयासमोर जात होता. तेव्हा पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

काल काय केलं संजय राऊतांनी?

पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेबद्दल हा प्रश्न होता. 'ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले होते. त्याबद्दल विचारल्यानंतर संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं.. पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव सांगताच, संजय राऊतांनी कॅमेऱ्यासमोरच बाजूला झुकून थूं.. असं केलं. त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.

आज काय घडलं?

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत त्र्यंबकेश्वर येथे दर्शन करून पुन्हा नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे येत असताना येत होते. शासकीय विश्रामगृहाच्या मार्गावर शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय आहे. संजय राऊत यांचा ताफा देखील याच मार्गावरून शासकीय विश्रामगृहाकडे निघाला होता.

त्यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू होते. संजय राऊत यांचा ताफा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून जात असताना दोन्ही गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय राऊत यांचं थुंकण्यावर स्पष्टीकरण

संजय राऊतांना थुंकण्याबद्दल विचारलं असता त्यांनी जोरात हसून उत्तर दिलं. ते म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा मग. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असं समर्थन राऊतांनी केलं. ते पुढे म्हणाले की, कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT