Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

अब सब को सभी से खतरा; फडणवीस-शिंदेंना टॅग करत राऊतांचं सूचक ट्वीट

आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतलं बंड आता शिगेला पोहोचलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना टॅग करत सूचक ट्वीट केलं आहे. ते सातत्याने ट्वीटच्या माध्यमातून किंवा सभेतून टीका करत असतात.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात की, अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं - जौन एलिया. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रियंका गांधींनाही टॅग केलं आहे.

शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बंडखोरी करुन भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता खासदारही शिंदे गटाकडे गेले आहेत. काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला काही खासदार गैरहजर होते.

दरम्यान, शिवसेनेला अजिबात धक्का लागलेला नाही, सत्ता असो वा नसो सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर सातत्याने शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. कायदेशीर लढाई, पक्ष संघटन, पक्षबांधणी अशा अनेक विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT