महाराष्ट्र

"मेरा यही अंदाज..."; संजय राऊतांचा रोख कुणाकडे

सुधीर काकडे

मुंबईच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या गोटात खळबळ माजवणाऱ्या संजय राऊत यांच्यामुळे गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राऊत यांनी भाजपवर (BJP) अनेक आरोप केले असून, येणाऱ्या काळात लवकरच सोमय्या (Kirit Somaiya) पिता पुत्र जेलमध्ये जातील असंही ते म्हणाले आहेत. तसंच शिवसेना (Shiv Sena) भवनध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण लवकरच भाजपच्या काही नेत्यांविरोधात धक्कादायक खुलासे करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यातच संजय राऊत यांनी आज एक नवं ट्विट केलं आहे. (Sanjay Raut New Tweet)

राज्यात आता महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये तुफान चिखलफेक सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपासून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या आतषबाजीचा आज दुसरा अंक पाहायला मिळाला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज रश्मी ठाकरे यांनी ‘त्या’ १९ बंगल्यांचा मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या जाहीर केल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊत ‘राष्ट्रवादी’च्या इशाऱ्यावरून शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप केला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ‘ईडी’च्या कारवाईला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचे म्हटले आहे.

त्यातच संजय राऊत यांनी आज पुन्हा एक नवीन ट्विट केलं असून, या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकरांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. "मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है..." असं ट्विट करत राऊत यांनी आपला एक खास फोटो शेअर केला आहे. राऊतांनी यापुर्वीही अनेकदा अशा पद्धतीनं ट्विट केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT