Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या स्वागताला विमातळावर आले बिहारचे मुख्यमंत्री; राऊत म्हणाले, नाम ही काफी है...

रोहित कणसे

भाजप सरकारविरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी पाटण्यात देशातील सर्व विरोधीपक्षांचे प्रमुख नेते दाखल झाले होते. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे नेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील सहभागी झाले होते. बैठकीत सहभागी प्रत्येकाचा पक्ष होता तरी आपल्याला सन्मानाने बोलवलं, विमानतळावर नितीशकुमार स्वागताला आले होते याला भाग्य लागतं असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

काल बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीसाठी पोहचले असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमरा हे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला हजर होते, याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "बैठकीला स्टॅलिन, अरवींद केजरीवाल, भगवंत मान, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासह इतरही नेते होते. प्रत्येकाचा पक्ष, चिन्ह होतं. पण आपल्याकडे काही नाही तरी आपल्याला सन्मानाने बोलवलं. स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विमानतळावर स्वागतासाठी आले होते. यासाठी भाग्य लागतं. हे भाग्य चक्रवर्ती राजालाच मिळू शकतं. त्यासाठी खुर्ची असावी लागते असं नाही सिर्फ नाम ही काफी है!"

पाटण्यात आम्ही जो नजारा पाहिला अख्या देशातून लोक जमले होते. उद्धव ठाकरेंनी देखील तेथे मार्गदर्शन केलं. २०२४ साली महाराष्ट्र आणि देशातून हे जुलमी सरकार उसथवून टाकण्याचा निश्चय तेथे करण्यात आला. आज मी वाचलं की गृहमंत्री अमित शाहांनी सांगितलं की तुम्ही कितीही एकत्र आलात तरी तिनशे जागा जिंकू, बघा काल नुसते एकत्र आलो तरी भाजपच्या शंभर जागा कमी झाल्या असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT