Sanjay Raut on bjp Chandrakant patil statment on balasaheb thackrey shivesena involvement in babri masjid demolition  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : 'बाळासाहेब बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते, हे भाजपला माहिती नाही का?'

रोहित कणसे

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतून आलावर चंद्रकांत पाटील सांगतात की बाबरीसंदर्भातील त्या घटनेत शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुखांचा काडीमात्र संबंध नव्हता. ते फार कुचेष्ठेने बोलले. यावर मिंधे काय म्हणतात हे आम्हाला ऐकायचं आहे. महाराष्ट्र आणि देश ऐकू इच्छितोय कि मिंधे काय बोलून हिम्मत दाखवतायत का की परत एकदा शरण जातायत असे संजय राऊत म्हणाले.

आयोध्याच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या घडामोडीत हिंदूत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला त्याग या देशाला माहितेय आणि त्याच त्यागातून भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे असेही संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी कांडानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले होते, त्यातील ते प्रमुख आरोपी होते. हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल देखील संजय राऊतांनी भाजपला केला.

इतक्या वर्षांनी बोलण्याची गरज काय होती. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते. हे सगळे पळपुटे आहेत. ही मुद्दाम बाळासाहेब आणि शिवसेनेवर केलेली चिखलफेक आहे. शिवसेनेचं आस्तित्व संपवण्यासाठी चाललेले हे खेळ आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते

"त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते," असं चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT