Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

'बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलं असंही म्हणतील'; राऊतांचा टोला

उद्या हे फुटीर लोक चंद्रावरही कार्यालय स्थापन करतील, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे गट आता थेट शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावरच दावा सांगू लागले आहेत. यावरुन शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. उद्या हे लोक बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच पक्षात आणलं हेही सांगायला कमी करणार नाहीत, असा टोला संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्या हा फुटीर गट चंद्रावरही आपलं कार्यालय स्थापन करेल. त्यांना मातोश्री हवंय, सेना भवन हवंय, सामना, शिवसेना हवीये. उद्या ते जो बायडेनचं ऑफिसपण ताब्यात घेतील. बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच पक्षात आणलं हेही सांगायला ते कमी करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना आम्हीच पक्षप्रमुख केलं, असंही म्हणतील.

शिंदे गटाला काल लोकसभेने मंजुरी दिली आहे. खासदार राहुल शेवाळे हे या गटाचे गटनेते झाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. दरम्यान, शिंदे गटाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह, शिवसेना भवन, आणि आपणच अधिकृत शिवसेना असा दावा केला आहे. त्यावरुन राऊतांनी शिंदे गटाला सुनावलं आहे. तसंच आपली तांत्रिक, कायदेशीर लढाई सुरूच राहील असंही राऊतांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले की, अशावेळी निर्णय घेण्याची खूप घाई असते. आपला विरोधी पक्ष फोडला जातोय, हे पाहून काहींना आनंद होतो. आता हेच पाहा, आमच्या पत्राला साधं उत्तरही नाही आणि शिंदे गटाला थेट मान्यता मिळतेय. यावरुनच लक्षात येतं की लोकसभेचं संसदेचं कामकाज कसं चाललंय.

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होईल. पण आज निर्णय येणं शक्य वाटत नाही. आम्हाला आता सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळण्याची आशा आहे. लोकशाहीची हत्या होणार नाही, अशी आशा आहे. ज्या पद्धतीने कायदा आणि घटनेची पायमल्ली करुन फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न चाललाय, त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं. आता तोच आशेचा किरण आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या 'जंतरमंतर'वरील आंदोलनाने वेधले लक्ष! रोहित शर्मा, सूर्या आणि बुमराहच्या पत्नींची प्रतिक्रिया चर्चेत

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Mumbai Local : कसारा मार्गावरील गर्दीला अखेर दिलासा; सप्टेंबरपासून १५ डब्यांच्या लोकलचा होणार विस्तार

SCROLL FOR NEXT