Sanjay Raut News Sakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचं रक्षण करू शकत नाही : संजय राऊत

काश्मिरी पंडीत रस्त्यावर उतरले असून त्यांनी सामुदायिक स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्नावरून केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. जम्मू काश्मिरमधील होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. "आम्ही काश्मिरी पंडितांचे रक्षण करू असं म्हणत सत्तेवर आले आणि आता खुलेआम हत्या केल्या जात आहेत. ते पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत." असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली आहे.

(Sanjay Raut On Central Government)

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेकडे आणि काश्मिरमधल्या प्रश्नाकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. भाजपा फक्त राजकारणात गुंतलं असून हे देशाचं दुर्दैव आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले की, देशद्रोही हा शब्द भाजपानेच हार्दिक पटेल साठी वापरला होता. त्यांना असे लोकं सापडत असतात त्यामुळे मी यावर जास्त काही बोलणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

"काश्मिरी पंडीत आज रस्त्यावर उतरले असून त्यांनी सामुदायिक स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. पंडितांच्या घरवापसीचं आश्वासन देणारं सरकार पंडितांचं रक्षण करू शकत नाही, केंद्र सरकार निवडणुका आणि राजकारण यामध्ये गुंतलं आहे. हे पंडितांचं आणि देशाचं दुर्दैव आहे." असं मत त्यांनी व्यक्त केलं.

नोटबंदीनंतर काश्मीर मधील दहशतवाद संपेल असं आश्वासन देणारं सरकार राजकारणात गुंतून पडलं आहे. त्यामुळे सरकारला पंडितांचा आक्रोश दिसत नाही म्हणून केंद्र सरकार पंडितांचं रक्षण करू शकत नाही असा टोला त्यांनी लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT