Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut on Maharashtra Politcs: महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार; संजय राऊतांनी सांगितलं कारण

शिंदे गटाचा मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अजित पवारांच्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात नवी समीकरण मांडलं गेलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. मी याला भूकंप मानत नाही, असं काहीतरी होईल याची आम्हाला पक्की माहिती होती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे. (Sanjay Raut on Maharashtra Politcs Maharashtra got new Chief Minister)

राऊत म्हणाले, मी याला भूकंप मानत नाही. राजकारणात ज्या गोष्टी घडणार होत्या त्या घडल्या आहेत. याची आम्हाला पक्की माहिती होती. आत्ताच्या सरकारकडं आकडा असतानाही त्यांना अजित पवारांची गरज लागते. यावरुन एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचं हे पहिलं पाऊल आहे. एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गांवर आहे, त्यामुळं दुसरं इंजिन सरकारला जोडलं आहे.

मंत्री मंडळाचा विस्तार शिंदे गटाचा व्हायचा होता

या घडामोडींनंतर माझ पवार साहेबांशी बोलणं झालेलं आहे. तसेच शरद पवारांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालेलं आहे. लोकांचा राज्यातील या नव्या समिकरणाला पाठिंबा नाही, भविष्यात आम्ही एकत्र आहोत. मुख्यमंत्र्यांसह जे गेले त्यांचे चेहरे पाहा मग त्यांच्या वेदना समजून घ्या. शिंदे गटाचे नेते होते त्यांचे चेहरे पाहा. शिंदे अपात्र ठरतील राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल. मी सामनातून व्यक्त केलं होत मी बोललो होतो ते खरं ठरलं आहे. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल हे माझ भाकीत नसून माझ पक्क मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT