Sanjay Raut on Rajya Sabha Election | Sanjay Raut News esakal
महाराष्ट्र बातम्या

सुहास कांदेंचं मत बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन - संजय राऊत

आपल्याकडे याबद्दलचे सगळे रेकॉर्ड्स आहेत, असंही राऊतांनी सांगितलं आहे.

वैष्णवी कारंजकर

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त अयोध्येमध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या सुहास कांदेंचं मत बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच न्यायालयापासून निवडणूक आय़ोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा प्रचंड दबावाखाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Sanjay Raut on Rajyasabha Election 2022)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. सुहास कांदेंचं (Shivsena MLA Suhas Kande) मत बाद करण्यापासून अनेक प्रकार या निवडणुकीत करण्यात आले. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करू शकत नाही, प्रचंड दबावाखाली आहे. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी सात तास लावले. दिल्लीतून आदेश आणला, त्याची माहिती आमच्याकडे आहे. मुंबईतून कोण बोलत होतं, काय सूचना होत्या, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे".

जे लोक परखडपणे बोलतात, भूमिका मांडतात, अशा सगळ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देतायत. राजकीय सूड, बदला, द्वेष या भावनेतून होतंय. राहुल गांधींची गेले तीन दिवस रात्री १२ पर्यंत चौकशी सुरू आहे. हे प्रकार अजून काही दिवस होत राहतील. ही हुकूमशाहीची सुरूवात नव्हे, हुकुमशाहीचं टोक आहे. आपल्या राजकीय विरोधकांना जुलमी पद्धतीने संपवण्याचं काम हिटलरनेही केलं नसेल. ज्या देशाच्या लोकशाहीचे दाखले जगभरात दिले जातात, त्या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. हा स्वातंत्र्याचा पराभव आहे. तो भाजपाच्या नेतृत्वाखाली होतोय. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

Smoking करायला बंदी असताना सुद्धा विमानात ashtrays का असतात? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

SCROLL FOR NEXT