Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi : सावरकरांच्या मुद्द्यावरुन मविआमध्ये फूट पडू शकते - संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी काल आपण राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगितलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय काढला आणि राज्यभरात गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असं सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

आज सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपण राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "तक्रारी दाखल करणे आणि प्रसिद्धी मिळवणे असा राजकीय उद्योग आपल्या देशात चालू आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, "बेरोजगारी, महागाई असे मुद्दे भारत जोडो यात्रेत असताना अचानक राहुल गांधींनी सावरकरांचा विषय का काढला? सावरकर कधीच भाजपा आणि संघाचे आदर्श पुरुष नव्हते. त्यांचे आयडॉल्स वेगळेच होते. भाजपाचे सावरकर प्रेम नकली आणि ढोंगी आहे." राहुल गांधींच्या वक्तव्याशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहमत नाही, असं मत व्यक्त केल्यावर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : श्रीकृष्ण जन्मभूमी वादात मोठा ट्विस्ट; ‘मुख्य दावा’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे संकेत

‘मुळशी पॅटर्न’मुळे नाव देशभर गाजलं, पण बदनामी झाली; आता ‘पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध! प्रवीण तरडेंना टेन्शन

Ghatkopar Landslide: नेटवर्क नसल्यानं डोंगरावरील घरात गेला, बर्थडेच्या आदल्या दिवशी ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

Malvan Accident: फिरायला गेला, शेवटच्या दिवशी दुचाकी अपघातात मृत्यू, मालवणच्या इंजिनिअर तरुणावर भूतानमध्येच अंत्यंसस्कार

SCROLL FOR NEXT