Raj Thackeray-Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

दिवा विझताना मोठा होतो! राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मशिदीवरील भोंग्यावरुन झालेल्या वादावर प्रत्युत्तर म्हणून ठेवलेली उत्तर सभा आज ठाण्यात पार पडली.

दत्ता लवांडे

मुंबई : राज ठाकरेंच्या पाडव्याच्या सभेवेळी मशिदीवरील भोंग्यावरुन झालेल्या वादावर प्रत्युत्तर म्हणून ठेवलेली उत्तर सभा आज ठाण्यात पार पडली. दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रावादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.

दरम्यान त्यांनी भाषणात मनसे हा विझलेला पक्ष नाही असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उत्तर दिलं आहे. जयंत पाटील यांनी मनसे हे विझत चाललेला पक्ष असल्याचं बोललं होतं. त्यांना उत्तर देत राज म्हणाले की मनसे हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. असं बोलत त्यांनी जयंत पाटलांना उत्तर देत 'जंत' पाटील असा त्यांच्या उल्लेख करत त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दोन ओळींच ट्वीट करत मनसेला चिमटा काढला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरुन पोस्ट करत म्हटलंय की, दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले ! जय महाराष्ट्र ! अशा दोन ओळींच ट्वीट करत त्यांनी मनसेवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यानंतर राऊतांचं हे ट्वीट सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या फेसबुक पेजवरसुद्धा पोस्ट टाकण्यात आली असून त्यात मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. पोस्टमध्ये म्हटलंय की, दिवा विझणार असतो तेव्हा जास्त फडफड करत असतो. शुभ रात्री... अशी पोस्ट करत त्यांनी मनसेला चिमटा काढला आहे.

आजच्या उत्तर भाषणात त्यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटलं होतं की, संजय राऊत हे कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे ते कळत नाही असं ते म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीवरही निशाना साधत शरद पवार हे जातीचं राजकारण खेळतात असा आरोप त्यांनी केला. तसंच आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचं नाव कधी घेत नाहीत असा टोला त्यांनी भाषणादरम्यान लगावला.

तसंच मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. आम्ही प्रार्थनेला विरोध करत नसून यामुळे होणाऱ्या त्रासाला आमचा विरोध आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच या भाषणादरम्यान अजित पवारांचे तीन व्हिडिओ लावून त्यांनी अजित पवारांची भोंग्याबद्दलची भूमिका लोकांना दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्यसन जडल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT