Sanjay Raut sharad pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : अदानी प्रकरणात शरद पवारांना काय म्हणायचं होतं राऊतांनी उलगडून सांगितला अर्थ

शरद पवारांची भूमिका ही पहिल्यापासून आहे यात काही नवल नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे सध्या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसंच त्यांनी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीबद्दलही भाष्य केलं आहे. आता पवारांच्या याच विधानाचा अर्थ संजय राऊत यांनी उलगडून सांगितला आहे.

याबद्दल स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, "पवारांची अदानींबद्दलची भूमिका वेगळी असली तरी मविआमध्ये तडे जाणार नाहीत. पवार साहेबांनी अदानींना क्लिनचिट दिली, असं मला वाटत नाही. चौकशीच्या पर्यायाबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जेपीसीमध्ये अध्यक्ष हा त्यांचाच असतो. दोषींना शिक्षा ज्या कोणत्या पर्यायी मार्गांनी मिळेल तो पर्याय आम्हाला मान्य आहे.

राऊत पुढे म्हणाले, "हे त्यांचं मत आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत. या देशात उद्योगपती जगला पाहिजे, मग ते अंबानी, असतील किंवा आणखी कोणी. उद्योगपतींशिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. याचा अर्थ देशात एक दोघेच राहतील आणि बाकीच्यांचे कारभार बंद होतील, असा नाही.

काय म्हणाले होते शरद पवार?

हिंडनबर्ग प्रकरणात संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीच्या मागणीला माझा आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. पण जेपीसीवर सत्ताधारी पक्षाचं वर्चस्व असेल. त्यामुळे सत्य बाहेर येणार नाही. जेपीसीपेक्षाही सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी राहील. जेपेसीमध्ये २१ पैकी १५ सदस्य सत्ताधारी आणि ६-७ लोक विरोधी पक्षाचे असतील, तर त्याचा उपयोग नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

शरद पवार पुढे म्हणाले,"राहुल गांधींनी आरोप केलेल्या १९ हजार कोटींच्या आकडेवारीबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही. बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न आहे, त्यावर भाष्य करणं मला महत्त्वाचं वाटतं. महाराष्ट्राला सगळ्यात जास्त वीज अदानींकडून मिळते, त्यांचं कौतुक नाही. पण त्यांचं योगदान मान्यच करावं लागेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT