Sanjay Raut Sanjay Raut
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut | 9 तासांनंतर संजय राऊत ED कार्यालयाबाहेर

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल नऊ तासापासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. त्यानंतर आज त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान ही जमीन कुठे आहे हेसुद्धा आपल्याला माहिती नसल्याचा दावा राऊतांनी केला होता. तब्बल ९ तासांपेक्षा जास्त वेळच्या चौकशीनंतर ते आता ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत.

(Sanjay Raut ED Investigation)

संजय राऊतांनी हा घोटाळा प्लॅन करून केला आहे असा ईडीचा दावा असून त्यानंतर आपल्यावर कर नाही तर डर कशाला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर, "ईडीच्या चौकशीत सहकार्य केलं असून त्यांना जी माहिती हवी आहे ती सर्व माहिती दिली आहे आणि अजून बोलावलं तर चौकशीसाठी हजर राहणार आहे." असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर पैसे आले असा दावा ईडीने केला आहे. त्याचबरोबर अलिबागचा प्लॉट घेण्यासाठी बऱ्यापैकी रोख पैशाचा वापर करण्यात आला होता असा दावा ईडी करत आहे. तसेच दादरमधील फ्लॅटही ईडीच्या रडारवर आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशीसाठी वेळ लागत असल्याचं सांगितलं जातंय.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

IPL 2026 : ओहहहह भाई.. मोहम्मद शमीचा 'मॅजिक' डान्स पाहिलात का? SRH वर दणदणीत विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन Video Viral

Latest Marathi News Live Update : ७५ विद्यार्थी परदेशात अडचणीत, फंडस् नॉट रिसिव्हीड अधिकाऱ्यांची लाजिरवाणी कबुली!

पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

भुयारी मार्गाने जोडले जाणार ठाणे-बोरीवली! देशातील सर्वात लांब शहरी बोगदा होणार; ११ किलोमीटरचा मार्ग कसा असेल?

SCROLL FOR NEXT