टायगर श्रॉफवर अल्पवयीनाकडून गोळीबार, दुसरा हल्लेखोर रॅपिडो ड्रायव्हर कम सुपारी किलर; धक्कादायक माहिती समोर

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनाचा सहभाग असल्याची आणि दुसरा संशयित रॅपिडो चालक असल्याची माहिती समोर आली आहे
Tiger Shroff Firing Case

Tiger Shroff Firing Case

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन परिसरात बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff Car Firing) गाडीवर गोळीबार करण्यात आला. यावेळी तीन अज्ञात हल्लेखोर बाइकवरून येत त्यांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर दहा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ सुदैवाने बचावला असून कारचालक आणि एक पादचारी जखमी झाला. या गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असताना पोलिसांनी ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ज्यामध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com