Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

पटोलेंच्या वकीलावर कारवाई; संजय राऊत म्हणाले 'चिंता नाही, कारण...'

सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीची धाड पडली आहे.

सुधीर काकडे

नाना पटोलेंच्या वकीलांवर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली. जे व्हिसस ब्लोअर आहेत, त्यांच्यावर कारवाई होतेय. कारवाई हा आता चिंतेचा नाही तर गमतीचा विषय झालाय असं राऊत यांनी म्हटलं आहे. नागपुरातून मला काही पत्रकार, वकील यांचे मला फोन आले. भविष्यात नाना पटोलेंवर जरी धाड पडली तर आश्चर्य वाटणार नाही असं संजय राऊत म्हणाले. चोर बाजारातील तराजू म्हटल्यावर टीका झाली, मात्र न्यायाचा तराजू एका बाजूला झुकलेला दिसतोय. केंद्रीय यंत्रणांचा वापर गुंडांसारखा होत असेल, तर हे संघराज्य व्यवस्थेला धोका आहे असं राऊत म्हणाले.

भाजपला पुर्ण बहुमत मिळालं नाही, तर एनडीए तयार होईल. मात्र २४ ला जर बहुमत मिळालं नाही तर एनडीए तयार होईल. सध्यात त्यांच्याकडे बहुमत असल्याने एनडीए भंगारात काढली असं राऊत म्हणाले.

युपीएच्या नेतृत्वासाठी काँग्रेसने स्वत: पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा, मात्र काँग्रेस तसं करताना दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एनडीएमधून बाहेर पडलेल्या सर्व पक्षांची चर्चा सुरु आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसनं युपीएच्या जीर्णोद्धाराची तयारी करायला हवी, मात्र तशी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीये असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

अर्थभान : ‘सीएएस’चा नवा पेच

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस; प्रकृती खालावली, समर्थकांनी महामार्ग रोखला

स्मार्ट गुंतवणूक : ग्रीन डिपॉझिटची सुविधा

ढिंग टांग : विषाला उतारा विषाचाच..!

SCROLL FOR NEXT