Sanjay Raut - Kirit Somaiya Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

अमित शहांचा मुलगा केळं विकतो का? संजय राऊतांचा सोमय्यांना सवाल

संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या वाईनरी कंपन्यांशी संंबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

सुधीर काकडे

राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा (Wine in Supermarkets) निर्णय घेतल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जातेय. भाजपनेते (BJP) किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) देखील गंभीर आरोप करण्यात आले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागच्या काळात काही वाईनरी चालकांशी पार्टनरशीप केल्याचा आरोप करत सरकारने हा निर्णय घेण्यामागे काही लोकांचा फायदा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना जोरदार टीका केली आहे. एखाद्या कुटुंबाती व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

राऊत कुटुंबियांचे वाईन उद्योजकांसोबत करार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. याबाबतची काही कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं. सोमय्यांनी जे नाव सांगितलं ते वाईनरी कंपनीत संचालक आहेत. संचालक असणं गुन्हा आहे का? भाजपच्या नेत्यांची मुलं केळी विकतात का? किरीट सोमय्यांचा मुलगा चने शेंगदाणे विकतो का? अमित शहांचा मुलगा केळी विकतो की ढोकळा विकतो? देवेंद्र फडणवीस यांची मुलं रोडवर स्टॉव टाकणार की डान्सबार टाकणार अशी तिखट शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. भाजप नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, भाजच्या लोकांंनी जे आरोप केलेत, ते जर खरे असतील तर त्या त्यांच्या नावावर करायला तयार आहोत असंही ते म्हणाले. भाजपच्या लोकांनी अशा प्रकरारचं घाणेरडं राजकारण सुरू केलंय. हे त्यांच्यावर उलटणार, तुम्ही आमच्या कुटुंबापर्यंत आलेत, मात्र तुमच्या सारखी आमची मुलं ड्रग्ज विकत नाहीत. भाजपच्या किती लोकांच्या वाईनरी आहेत ते पाहा. तसंच वाईन विक्रीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या कुटुंबाने वाईन उद्योगातील मोठ्या व्यक्तीशी पार्टनरशिप सुरु केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांचा उद्योग फक्त पैसे गोळा करणं हाच आहे. महाराष्ट्राला तुम्ही मद्यराष्ट्र केलंत. वाईन व्यावसायिक अशोक गर्ग यांच्याशी पार्टनरशिप कधी केली? त्यांची जॉइंट पार्टनरशिप, कन्या आणि पत्नी किती व्यवसायात आहेत असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT