sanjay raut
sanjay raut esakal
महाराष्ट्र

छगन भुजबळ-सुहास कांदे वाद प्रकरणी संजय राऊतांनी दिला सल्ला!

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी देखील थोडं संयमाने घेतलं पाहिजे. राजकारणात असे प्रसंग घडल्यास त्यांनी राजकारणात आलेल्या नव्या चेहऱ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे असा सल्ला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी दिला. नांदगावमध्ये झालेल्या बाचाबाची नंतर पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (shivsena MLA suhas kande) यांच्यात आपत्कालीन निधी वरून खडाजंगी झाली होती. त्यानंतर आज (ता.२४) सुहास कांदे यांनी भुजबळांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (high court) धाव घेतलीय. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळांविरोधात पाचशे पुरावे - सुहास कांदे

काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात एका बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर भुजबळांविरोधात कांदेंनी हायकोर्टात धाव घेतल्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणी याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

पंचनामे करण्याच्या मुद्यावरुन खडाजंगी

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात (ता.११) मोठी शाब्दिक चकमक झाला होती. आपत्कालीन निधी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या मुद्यावरुन पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुहास कांदे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. नाशिकमधील नांदगावमध्ये हा प्रकार घडला आहे. सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT