Sharad Pawar CM Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया...

रोहित कणसे

महाविकास आघाडी सरकारच्या सत्तांतरानंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये साधारणपणे ४० मिनीटं चर्चा झाली. दरम्यान या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यादरम्यान शरद पवार अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने उलटसुलट चर्चा झाली होती यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत काय म्हणाले?

शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचं राजकरणं हाललं, ढवळून गेलं असं काही झालं नाही. त्यांचं (एकनाथ शिंदे) सिंहसन लवकरच हालणार आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेट ही औपचारिक निमंत्रण देण्यासाठी झालेली दहा-पंधरा मिनीटांची भेट होती.

राऊत पुढे म्हणाले की, मराठा मंदिर ही राज्यातील महत्वाची संस्था आहे. या संस्थेच्या कार्यक्रमासाठी हे निमंत्रण होतं अशी आमची माहिती आहे. राजकारणात खळबळ माजली, अमूक-तमूक झालं यातून आपण बाहेर पडलं पाहीजे, असे संजय राऊत म्हणाले.तसेच पुढे बोलताना त्यांनी विधीमंडळातील विरोधी पक्षातील आमदार भेटत असतात. याचा अर्थ खळबळ माजली असं म्हणता येणार नाही असेही राऊत म्हणाले.

पवार-अदानी भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी काल गौतम आदाणी यांची देखील भेट घेतली होती, यावर देखील राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावरे होऊद्याकी, त्यांची बैठक आहे आम्ही कशाला त्यावर बोलावं. हा काही देशातील चर्चेचा विषय नाहीये अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

पवार शिंदे भेटीत काय झालं?

मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचंही सांगितलं जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यातून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ही भेट राजकीय नव्हती, असंही मुनगंटीवार म्हणाले.

सायंकाळी अचानकपणे शरद पवार शिंदेंच्या भेटीला गेल्याने सर्वांच्या भोवया उंचावल्या होत्या. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT