Sanjay Raut tweet marathi news Sanjay Raut tweet marathi news
महाराष्ट्र बातम्या

काय चालले आहे? संजय राऊतांचा थेट राज्यपालांना सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिंदे गट आणि भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. हे सरकार स्थापन होऊन अर्धा महिना लोटला आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडून अन्य कोणत्याही मंत्र्याने शपथ घेतलेली नाही. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना ट्विट करीत सवाल केला आहे. (Sanjay Raut tweet marathi news)

‘भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४, १अ नुसार राज्य मंत्रिमंडळात किमान १२ मंत्री असायला हवे. यापेक्षा कमी मंत्रिमंडळाला संविधान मान्यता देत नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. घटनात्मक नसलेल्या निर्णयांना वैधता नसते. राज्यपाल, काय चालले आहे?’ असे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहे. आता २० जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. आता या तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की नाही, हेच पाहणे बाकी आहे.

एकनाथ शिंदे गटच्या निलंबित केलेल्या १६ आमदारांवर अद्याप निर्णय आलेला नाही. सुप्रीम कोर्टाने (supreme court) या प्रकरणात घाईघाईने निर्णय देता येणार नसल्याचे म्हटले आहे. यामुळेच आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला होता. मात्र, सुप्रीम कोर्टातून निर्णय न आल्याने थोडक्यात विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आधी १९ तारीख ठरवण्यात आली होती. आता ती २० जुलै झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT