sanjay raut  sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

राऊत नागपुरात आल्याने भाजपात धास्ती; पोलिस आयुक्तांची घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रापासून तर राज्यातील भाजपच्या नेत्यांना अंगावर घेणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपूरमध्ये येऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकजण धास्तीत आहेत. ते कोणता बॉम्ब फोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

संजय राऊत रविवारी नागपूरले आले होते. शहरात आल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त यांची भेट घेतली. या भेटीबाबत त्यांनी बोलण्याचे टाळले. फक्त सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले. मात्र, अलीकडेच राऊत यांनी महाआयटी घोटाळ्यात अमोल काळे आणि अजय ढवंगळे यांची नावे घेतली होती. अमोल काळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे निकटवर्ती आहेत. ते लंडनला पळून गेले असावे अशी शंकाही व्यक्त केली होती. दुसऱ्याच दिवशी काळे यांनी राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात अवामान याचिका दाखल करणार असल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळून लावले होते.

संजय राऊत यांचे नातेवाईक तसेच कुटुंबीयांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. तेव्हापासून ते जास्तच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी आपल्याला त्रास दिला जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढू असाही इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

ही नियमित आणि साधीसुधी बाब नाही

आरोप-प्रत्यारोप आणि कारवाया आता वैयक्तिक स्तरावर आल्याने राऊत यांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन फडणवीस यांच्या निकटवर्तीयांची माहिती गोळा करीत असल्याचे बोलले जाते. फडणवीस यांच्या कार्यकाळात अमोल काळे यांना नागपूर (Nagpur) महापालिकेचे एलईडी पथदिवे लावण्याचे कंत्राट दिले होते. ते सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. एकूणच संजय राऊत यांचे तडकाफडकी नागपुरात येणे आणि पोलिस आयुक्तांची भेट घेणे ही नियमित आणि साधीसुधी बाब नाही असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT