Shahaji Patil on sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ''मोदींची चूकच झाली, संजय राऊतांना चांद्रयानात बसवून...'' शहाजीबापूंची बोचरी टीका

संतोष कानडे

मुंबईः काल इस्रोने 'चांद्रयान ३' ही मोहीम यशस्वी करत दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आहे. याच चांद्रयान मोहिमेवरुन आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर खरपूस टीका केली. मोदींनी राऊतांना यानात बसवून चंद्रावर पाठवून द्यायला पाहिजे होतं, असं म्हणत त्यांनी समाचार घेतला.

शहाजीबापू पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदी साहेबांची एक चूकच झाली. चंद्रावर जाणाऱ्या यानात संजय राऊत टाकून नेला असता तर महाराष्ट्राची किरकिर मिटली असती. मोदी साहेबांना हे कुणीतरी सांगायला पाहिजे होतं. ह्याला एकदा घेऊन जावा महाराष्ट्र निवांत राहिल... असं म्हणत त्यांनी बोचरी टीका केली.

संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार, या बातमीवर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू म्हणाले की, लई आबदा होईल बिचाऱ्याची.

संजय राऊतांना चांद्रयानात बसवून पाठवून द्यायला पाहिजे, अशी टीका केल्याने संजय राऊत काय उत्तर देतात पे पाहाणं महत्त्वाचं आहे.

काल भारताच्या चांद्रयान ३ ने प्रत्येक टप्प्यावर यशस्वी वाटचाल करीत मोहीम फत्ते केली. जगाच्या पाठीवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत एकमेव देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाची मोहीम फेल ठरली होती. जगभरातून इस्रोच्या मोहिमेचं कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT