Sanjay Raut Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मग सरकारमध्ये कशाला आहात? मराठा आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावर राऊतांचा हल्लाबोल

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षाचा मुद्दा पेटला आहे.

रोहित कणसे

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारकडून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी त्रालयात सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवल्याच्या चर्चा आहेत. यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, मुळात ही सगळी नौटंकी आहे. अजित पवार गटातील लोकं जाऊन मंत्रालयाला टाळं ठोकतात.मग सरकारमध्ये कशाला आहात? सरकारला टाळं ठोका. ईडीच्या कारवाया वाचवण्यासाठी तुम्ही सरकार स्थापन करता. तो तोडगा तुमच्याकडे आहे. पण मराठ्यांना हक्काचं आरक्षण देण्यासाठी तोडगा नाही. रस्त्यावर येऊन बसता, मंत्रालयाला टाळं ठोकणं ही नौटंकी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गुरुवारी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले होते. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं होतं. यावरून राजकारण पेटलं आहे.

"सत्तेत असताना अशी आंदोलन करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्यास जनतेत चुकीचा मेसेज जाऊ शकतो, अशा आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचा मेसेज जाऊ शकतो. महायुती म्हणून आपण सर्वांनी अशा परिस्थितीत एकत्र राहायला हवं", अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT