sanjay raut slam eknath shinde devendra fadanvis govt ministers over ncp rohit pawar belgaon visit  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Border Dispute : मंत्री गेले नाहीत पण रोहित पवार…; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील सीमाप्रश्ना चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त विधानानंतर हा वाद नव्याने उफाळतो.

दरम्यान या वादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या प्रकरणी मध्यस्थी करणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यादरम्यान संजय राऊतांनी पुन्हा सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचे ट्विट शेअर केलं आहे. रोहित पवार यांनी आज काही फोटो ट्विट करत, बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतल्याची माहिती दिली होती.

तसेच मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले असेही रोहित पवार म्हणाले. दरम्यान हेट ट्विट शेअर करत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना टोला लगवाला आहे.

हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

कर्नाटक-महाराष्ट्र वादाच्या पार्श्वभूमिवर ६ डिसेंबरला शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव येथे भेट देणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता. यावरून संजय राऊत यांनी "मंत्री पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले! इच्छा आणि हिम्मत असली की आडवे येणारे पळून जातात." असं ट्विट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT