sanjay raut news esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : 'संजय राऊत स्वतःचे कपडे फाडून रस्त्यावर दगड मारत फिरतील', शिवसेनेकडून थुंकी प्रकरणात टीका

संतोष कानडे

मुंबईः भर पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर संजय राऊतांनी 'थू' म्हणत थुंकल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांच्याबद्दल तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेबद्दल हा प्रश्न होता. 'ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले होते.

त्याबद्दल विचारल्यानंतर संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव सांगताच, संजय राऊतांनी कॅमेऱ्यासमोरच बाजूला झुकून थूं.. असं केलं. त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्त नरेश म्हस्के यांनी एक व्हीडिओ ट्वट करीत संजय राऊतांवर आसूड ओढला. 'सत्ता गेल्यामुळे संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्या दिवसात स्वतःचे कपडे फाडून दगड मारीत रस्त्यावर फिरणार आहेत. त्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या शरद पवार साहेब आणि उध्दव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर करावी' असं ट्वीट म्हस्के यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT