Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : "गृहमंत्री म्हणतात स्टंट आहे, मग त्यांच्या घरात..." ; ठाकरे गटाच्या नेत्याचा फडणवीसांवर आरोप

Sandip Kapde

Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने 'तेरा भी मुसेवाला कर दूंगा' असा मेसेज केल्याचा दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

'जर तू दिल्लीत सापडलास तर तुला एके ४७ ने उडवून देईन, तू मुसेवाला होशील', असा मेसेज संजय राऊत यांना करण्यात आला. दरम्यान संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. 

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा गुंडांच्या मदतीने मला धमकी देतो. याबाबत मी गृहमंत्र्यांना माहिती दिली तर ते म्हणतात हा स्टंट आहे. मग त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) घरात होतो तो स्टंट नाही आहे का?. त्यासाठी तुम्ही एसआयटी तयार करता. लोकांना पकडून आणता. हा तर सर्वात मोठा संस्ट आहे. खर काय आहे हे मला माहित आहे. मात्र मला मर्यादा राखायची आहे. 

ठाण्यातील गुंड टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचे नाव आहे, मी याबाबत स्पष्ट सांगितले आहे. काल देखील मला धमकी आली मी ते पोलिसांना सांगितले आहे. मात्र  विरोधकांना येणाऱ्या धमक्या हे लोक गांभीर्याने घेत नाहीत. पोलीस यंत्रणा फक्त पोलिसांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाई करण्यासाठी वापरण्यात येत आहे, असे राऊत म्हणाले. 

गृहमंत्री चेष्टा करतात- 

ज्यांनी सलमान खानला धमकी दिली त्याच गँगकडून मला धमकी आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असेल तर मी पोलिसांचा आभारी असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचे सरकार गांभीर्याने घेत नाही. संपूर्ण पोलीस यंत्रणा गद्दार गटाला सुरक्षा देण्यात व्यस्थ आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. महाराष्ट्रात दंगली होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. आम्हाला आलेल्या धमक्यांची आम्ही माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्टा करतात, हा स्टंट असल्याचे म्हणतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT