Sanjay Raut Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं - संजय राऊत

शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊत करतायत असा आरोप शिंदे गटातल्या नेत्यांसह अनेक भाजपा नेत्यांनी केलाय.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, शरद पवार आणि संजय राऊत यांना शिवसेना संपवण्यास जबाबदार धरलं आहे. तर संजय राऊत सातत्याने बंडखोरांवर टीका करत आहेत.

आजही राऊतांनी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी लेखक प्रेमचंद यांची एक ओळ ट्वीट केली आहे. ट्वीटमध्ये राऊत म्हणतात, "संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं...! - प्रेमचंद". या ट्वीटसोबत राऊतांनी उद्धव ठाकरेंचा हात धरलेला आपला एक फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या अनेक आमदारांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवलं, राष्ट्रवादीसोबत युती करण्यास भाग पाडलं, तसंच शिवसेना संपवण्याचा कट रचला असे अनेक आरोप भाजपा नेत्यांनी तसंच शिंदे गटातल्य अनेक बंडखोरांनी वारंवार केले आहेत. तर संजय राऊतांनी वारंवार कठोर शब्दांत एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर टीका केली आहे. त्यांच्या टीकेच्या भाषेवरुनही अनेक बंडखोर नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT