Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: 'भारत जोडो यात्रे'त सामील होणार राऊत? सुटकेनंतर काँग्रेसकडूनही स्वागत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. त्यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यामुळे आता राऊत आगामी काळात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करणार हे निश्चित आहे. शिवाय ते काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार हे निश्चित मानलं जात आहे.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपलं नियोजन वेगळं आहे. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांनी आधीच भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान आज संजय राऊत कारागृहातून बाहेर आले आहेत. संजय राऊत यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. शिवाय काँग्रेसने देखील संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे संजय राऊत सहाजिकच भारत जोडो यात्रेत सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहे. याआधी देखील दिल्लीतील एका आंदोलनात संजय राऊत राहुल गांधींसोबत सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

धक्कादायक ! ICU मधील वृद्ध महिला रुग्णाला उंदरांनी कुरतडले; रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड

IPL 2026 Marathi News: ना CSK, ना KKR... आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार? ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणाला?

SCROLL FOR NEXT