Sanjay Raut's brother Sunil Raut , Nitesh Rane, Sanjay Shirsat 
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंना दीड फुट्या, चिंधीचोरचा मुलगा म्हणत सुनील राऊतांचा हल्लाबोल; शिरसाटांना म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबई - ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यासह भाजप आमदार नितेश राणे यांच्यात सातत्याने टीका टीप्पणी सुरू आहे. आज या वादात संजय राऊत यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांनी उडी घेतली. यावेळी त्यांनी नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्यावर कडाडून टीका केली.


सुनील राऊत म्हणाले की, संजय शिरसाट यांनी आम्हाला शिकवू नये. जो माणूस एक ईडीची नोटीस आली आणि 50 कोटींसाठी मिंधे गटात पळाला, तो काय आम्हाला शिकवणार? खरी निष्ठा आमच्याकडे आहे. संजय राऊत म्हणजे संजय शिरसाट नाही.

ते पुढं म्हणाले की, ज्या संजय राऊतांनी ईडी आणि भाजपसमोर गुडघे टेकले नाही. परंतु जेल पत्करले, त्यांच्याविषयी आम्हाला संजय शिरसाट यांच्याकडून काहीही शिकण्याची गरज नाही. नितेश राणे बाबत बोलताना सुनील राऊत म्हणाले की, त्या दीड फुटावरती काय बोलणार? काल प्रकाश आंबेडकर फार चांगलं बोलले आहे, चिंधीचोर. तो चिंधीचोरचा मुलगा आहे. त्याला फक्त भुंकण्यासाठी ठेवला असल्याची टीकीही सुनील राऊत यांनी केली.

दरम्यान दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असून ओरिजनल शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. शिवसेना आमचीच हा निकाल दसरा मेळाव्याच्या आधी लागेल, असा दावाही राऊत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT