sanjay shirsat esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रियंका चतुर्वेदी प्रकरणावरुन चंद्रकांत खैरेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, फालतू बडबडीकडे....

संतोष कानडे

मुंबईः शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चतुर्वेदी यांचा उल्लेख करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट एकेरी उल्लेख करत टीका केली.

काय म्हणाले संजय शिरसाट?

"ठाण्यातील सभेत ती कोण प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेवर बोलत होती. ती सांगत होती गद्दारांना काहीतरी करायचं होतं. कोण ही चतुर्वेदी? तर शिवसेनेचे त्या काळचे आता उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते, आदित्यंनी तिचे सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली.. ती बाई प्रियंका चतुर्वेदी, ह्या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या आणि ह्या आम्हाला निष्ठेच्या गप्पा सांगत आहेत. हा मोठा विरोधाभास आहे," असे विधान संजय शिरसाट यांनी काल केले होतं.

चंद्रकांत खैरे यांचं प्रत्युत्तर

प्रियंका चतुर्वेदींचा मुद्दा गाजत आहे आणि तुमचं नाव पुढे येत आहे, असा प्रश्न खैरेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, संजय शिरसाटांच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही. ते बडबड करत असतात. त्याला महत्व देत नाही. आमचे दौरे सुरु झालेले आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे, त्यात आम्ही बिझी आहोत.

मात्र ते लोक आम्हांला गुंतवण्याचं काम करतात. फालतू माणसाच्या बडबडीकडे लक्ष जावं म्हणून असं केलं जात आहे. बाळासाहेबांनी आम्हांला कडवटपणा शिकवला असून या प्रकरणात मला गुंतवण्याचं षड्यंत्र सुरु आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांचं संजय शिरसाटांना उत्तर

संजय शिरसाटांना उत्तर देताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की," मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला, संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात. यात आश्चर्य नाही की, भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT