Sanjay Shirsath press conference alligation on Sushma Andhare  
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsath : 'परळीत कुणाची धिंड काढली होती? जास्त बोलायला लावू नका!' शिरसाटांचा अंधारेंना इशारा

आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Shirsath press conference alligation : आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसांपासून राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे शिरसाट यांच्यावर सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या वाटेला गेल्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे.

आमदार संजय शिरसाट यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अंधारे यांनी दुसऱ्यांवर बोलताना आपण काय शब्द वापरतो, आपली भाषा काय असते याचा विचार करावा, मला बोलल्यास मी काही शांत बसणार नाही. त्यांना त्यांचेच भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. दुसरीकडे अंधारे यांनी पोलिसांकडे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्याचे झाले असे की, छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. यावरुन मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानं शिरसाट यांनी पत्रकार परिषेदतून अंधारे यांना चांगलेच सुनावले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये शिरसाट म्हणाले, आम्हाला जास्त काही बोलायला लावू नका. तुम्ही जे शब्द वापरता ते योग्य आहेत का, वरातीतला घोडा असे शब्द वापरणे हे एका महिलेला शोभते का, तुम्ही आतापर्यत प्रत्येक ठिकाणी जी भाषा केली आहे ती चुकीची आहे. आम्हाला बोलायला लावू नका. परळीमध्ये कुणाची धिंड काढण्यात आली होती हे सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा माझ्याशी वाद घालू नका नाहीतर मी जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT