sanjay shirsat 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Sirsat : "नांदेडच्या घटनेची सीआयडी चौकशी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा"; संजय शिरसाटांची मागणी

सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणावर शिरसाटांनी सडेतोड भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नांदेडसह छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या रुग्णांच्या आणि नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.

याप्रकरणी सीआयडी चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Sirsat demanded CID inquiry into Nanded Hospital incident and file case of culpable homicide)

सीआयडी चौकशी करा

माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले, "नांदेडच्या घटनेवरुन राजकारण करु नका, कारण हा हीन प्रकार आहे. सर्वसामान्य रुग्णालयात गरिबांची मुलं जातात. या ठिकाणी व्यवस्थित औषधोपचार केले जात नाहीत, हे मी स्वतः बोलतो आहे. कारण काही दलाल तिथं बसलेले आहेत. विरोधक सरकारवर आरोप करतात आणि नंतर सरकार सारवासारवं करतं, हे आता बंद झालं पाहिजे. त्यामुळं या प्रकरणांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. (Latest Marathi News)

हाफकीन सरकारी अनुदानाची बिलं काढण्यात व्यस्त

औषध निर्माता कंपनी हाफकीन औषधांचा पुरवठा करत नाही. काही जुने औषध पुरवठादार होते ते केवळ सरकारी अनुदानाची बिलं काढण्यात वेळ घालवत होते. सर्वसामान्य लोकांना तिथं औषधं उपलब्ध होत नाहीत, त्यामुळं त्या दवाखान्यांच्या अजुबाजूला असलेली औषधांची दुकानं जोमानं चालतात. यामध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक होते, हे रॅकेट आहे. मी सरकारमध्ये असूनही हे बोलतो आहे. (Marathi Tajya Batmya)

मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार

तुम्ही याला राजकारणाच्यादृष्टीनं बघू नका. विरोधकांनीच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनीही त्यावर तुटून पडा आणि एकदाचं हे संपवा. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याप्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून ही मागणी करणार आहे. याप्रकरणी थोडीजरी चूक झाली तरी त्यामध्ये कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असंही यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT