Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shirsat Vs Andhare: "गेली उडत आमदारकी! धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"; संजय शिरसाटांचा इशारा

सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी संजय शिरसाट हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत माध्यमांसमोर त्यांनी आपली बाजू मांडली यावेळी त्यांनी अंधारे यांच्या बोलण्याच्या पद्धतींवर आक्षेप घेत सडकून टीका केली. (Sanjay Sirsat Shirsat gives warning to Sushma Andhare)

सिरसाट म्हणाले, तुमच्या पाठीमागे जे कर्तेधर्ते आहेत त्यांनाही सांगतो संजय शिरसाट पोटासाठी राजकारण करणारा माणूस नाही. तुम्हाला जर लढायचं असेल तर समोरासमोर लढा. यापुढं लक्षात ठेवा माझ्याविरोधात जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. कुठेही मी मागं हटणार नाही. गेली उडत ती आमदारकी, यासाठी माझा जन्म झाला नाही. ज्या शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे त्याच बाण्यानं मी लढणार आहे.

हे जे सुरु आहे त्याकडं लोक डोळे उघडे ठेवून बघत आहेत. सगळ्याचं तुमच्याकडं लक्ष आहे. आम्हाला घेणं देणं नाही, जेवढं वाटोळ करायचं आहे तेवढं त्या पक्षाचंही करा. तुम्हाला एका ठिकाणी थांबायची सवय नाही. आत्तापर्यंतची जे काही तुमचं भ्रमण सुरु आहे, इथं तुमचा शेवट होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही सर्व पक्ष फिरुन गोल चक्कर मारून एका काठावर तुम्ही आला आहात.

वैयक्तिक बाबतीत मी जात नाही, परळीत कोणाची धिंड काढली होती हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळं जास्त बोलायला सांगू नका, तुम्हाला जर खोलात जाता येतं ना, तर मलाही खोलात जाता येतं मग तुमची पळता भुई थोडी होईल, अशा शब्दांत यावेळी सिरसाट यांनी अंधारे यांना इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचाच'', सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार का? मुख्यमंत्री काय म्हणाले?

Pune Police : पुणे शहरात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; वरिष्ठ पदांवर सहा अधिकाऱ्यांची नेमणूक

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालय रुद्रपूर आणि जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय पिथौरागढ वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश

Pune Accident: हडपसरमध्ये पुन्हा अपघात; टँकरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू, मृताची ओळख पटली नाही

Land Measurement: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! जमीन मोजणीचे कठोर नियम शिथिल; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT