Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

'शंभर कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत'

सकाळ डिजिटल टीम

या बॅनरवरती मंत्री नारायण राणे यांचा देखील फोटो पहायला मिळतोय.

शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनावर काही तासांत सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गसह राज्यातील काही भागात तणावपूर्ण वातावरण पहायला मिळतंय. दादर टीटी परिसरातील काही राणे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी एका फ्लेक्सव्दारे नितेश राणे यांना समर्थन दिलंय.

टीटी परिसरातील कट्टर राणे समर्थक संकेत ताराचंद बावकर (Sanket Bavkar) यांनी एक लक्षवेधी बॅनर बनवून नाव न घेता महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार टीका केलीय. त्यांनी बॅनरवर नितेश राणेंच्या समर्थनार्थ 'शंभर कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही, वाघ हा वाघच असतो, असं म्हंटलंय. त्यांच्या या अशा बॅनरवरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बॅनरवरती मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा देखील फोटो पहायला मिळतोय. अद्याप, या बॅनरवर संबंधित प्रशासनाकडून कोणत्याचं प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

शिवसैनिक हल्ल्यामुळं आता एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील एक बड्या नेत्याला पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. त्या नेत्यांना पोलिसांनी ठाण्यात हाजीर हो, असा फर्मान बजावलाय. त्यामुळं सर्वांचीच अस्वस्थता वाढलीय. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. हे प्रकरण जिल्हा बँक निवडणुकीमुळेच (Bank Election) घडल्याचा आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर सध्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर अंतरिम सुनावणी होणार आहे. ही घटना ताजी असताना जिल्ह्यातील एका बड्या नेत्यालाही पोलिस ठाण्यात हजर होण्याची नोटीस बजावण्यात आलीय. त्यामुळं कणकवली पोलिस ठाण्यांमध्ये (Kankavli Police Station) सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून बसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT