Uddhav Thackeray_Santosh Bangar 
महाराष्ट्र बातम्या

हकालपट्टीनंतर बांगर भडकले; थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

हिंगोलीत करणार शक्तीप्रदर्शन, नंतर बांगर होणार मुंबईकडे रवाना

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा प्रमुखपदावरुन शिवसेनेकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भडकलेल्या बांगर यांनी शक्तीप्रदर्शनाचा निर्णय घेतला असून थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. (Santosh Bangar angry after eviction from ShivSena gives challenge to Uddhav Thackeray)

बांगर म्हणाले, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. माझी कुठलीही चूक नाही पण मी सकाळपासून मीडियात बघतोय की, मला पदावरुन हटवण्यात आलं आहे. पण मी पदावरुन दूर झालेलो नाही. मी आजही शिवसेनाचा जिल्हा प्रमुख आहे आणि उद्याही राहिन.

उद्धव ठाकरेंची कोणीतरी दिशाभूल करत आहेत. मला त्यांना एवढचं सांगण आहे की त्यांनी दिशाभूल करणाऱ्यांना थोडसं बाजूला करावं आणि जो ओरिजिनल पडद्याकडं बघण्याचा दृष्टीकोन ठेवा. आपण खरंच चांगले नेते आहात. लहान तोंडी मोठा घास घेणं चुकीचं आहे. पण आपले ४० आमदार शिंदे गटाकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी गेले आहेत.

जर ही बाब चूक असेल तर आम्ही शिवसैनिक ती चूक कधी करणार नाही. कारण शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला आम्ही मतदान केलं आहे, आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही. आज तुम्हाला सांगतो आणखी १२ खासदार आणि ५०च्यावर जिल्हाप्रमुखांनी आम्ही शंभर टक्के तुमच्यासोबत आहोत, असं आम्हाला सांगितलंय. बाकीचे शिवसैनिकांना जी भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती होती तीच मान्य होती, असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT