Nitesh Rane in Santosh Parab Case google
महाराष्ट्र बातम्या

अटकेच्या टांगत्या तलवारीनंतर नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी धाव

रावराणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : शिवसैनिक संतोष परब (Satntosh Parab) वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे (Rajendra Ravrane) यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. यावर २८ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. रावराणे यांनी दिली आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष तथा जिल्हा बँक निवडणुकीतील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवली (Kankavli) शहरातील नरडवे (Narvade) फाट्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयिताना त्याच दिवशी फोंडाघाट चेकपोस्ट येथून ताब्यात घेण्यात आले होते. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांचा हात असल्याचा आरोप फिर्यादीत परब यांनी केलाआहे. त्यानुसार राणे व सावंत यांना चौकशीची नोटीस पोलिसांनी बजावली होती. त्यानंतर त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती.

दरम्यान, पुणे येथील एका व्यक्तीला दिल्ली येथून काल ताब्यात घेण्यात आल्याने आमदार राणे यांना अटकेची शक्यता वाढली आहे.त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्यावतीने अॅड रावराणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २८ ला सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT