solapur bar asociation election

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष संतोष पाटील! विधीसंकल्प पॅनेलची बाजी, १६८४ पैकी १४३८ वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क; सहसचिवपदासाठी क्रॉस वोटिंग

सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधीसंकल्प पॅनेलने बाजी मारली. पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. संतोष पाटील यांनी विजय मिळवत पॅनेलचे उपाध्यक्ष (खुला व महिला गट), खजिनदार व सचिव असे पाच उमेदवार निवडून आणले. मात्र, सहसचिवपदाच्या त्यांच्या उमेदवार रेखा लगशेट्टी गोटीपामुल यांचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाल्याचे निकालातून पाहायला मिळाले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधीसंकल्प पॅनेलने बाजी मारली. पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. संतोष पाटील यांनी विजय मिळवत पॅनेलचे उपाध्यक्ष (खुला व महिला गट), खजिनदार व सचिव असे पाच उमेदवार निवडून आणले. मात्र, सहसचिवपदाच्या त्यांच्या उमेदवार रेखा लगशेट्टी गोटीपामुल यांचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाल्याचे निकालातून पाहायला मिळाले.

सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी एक हजार ६८४ वकील मतदार होते; पण त्यांपैकी २४६ जण मतदानासाठी आलेच नाहीत. मंगळवारी (ता. ४) जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत सर्वाधिक मतदान झाले. पहिले मतदान मावळते अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी, तर शेवटचे मतदान मावळते सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चौघेजण रिंगणात होते. याशिवाय सचिव, दोन्ही उपाध्यक्ष पदांसाठी थेट लढत झाली. तर सहसचिवपदासाठी तीन महिला उमेदवार होत्या. खजिनदारपदासाठी चौघांमध्ये लढत झाली. यात ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. अंजली बाबरे, ॲड. नरेंद्रकुमार गावडे हे पॅनलशिवाय स्वतंत्र लढले.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. रियाज शेख, ॲड. बसवराज हिंगमिरे, ॲड. अविनाश बिराजदार, ॲड. संजय पवार, ॲड. प्रवीण कुलकर्णी, ॲड. विकास कुलकर्णी, ॲड. शुभम माने यांच्यासह २५ जणांवर मतमोजणीची जबाबदारी होती. रात्री पावणेएकच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. यंदाच्या निवडणुकीत विधीसंकल्प पॅनलने बाजी मारली. अध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले ॲड. राजेंद्र फताटे यांना चौथ्यांदा पराभव सहन करावा लागला.

निवडणुकीचा निकाल अन्‌ नूतन पदाधिकारी

  • अध्यक्ष : ॲड. संतोष पाटील (पराभूत : ॲड. एस. आर. रेशमे, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. मल्लिनाथ म्हमाणे).

  • उपाध्यक्ष : ॲड. परमानंद जवळकोटे (खुला गट) (पराभूत : ॲड. परवेज ढालायत), महिला राखीवमधून ॲड. शर्मिला देशमुख (पराभूत : ॲड. उर्मिला जहागीरदार).

  • सचिव : ॲड. जयप्रकाश भंडारे (पराभूत : ॲड. मंजुनाथ कक्कलमेली).

  • सहसचिव : ॲड. प्रियंका गोरंटी (पराभूत : ॲड. मेघना मलपेद्दी, ॲड. रेखा लगशेट्टी गोटीपामुल).

  • खजिनदार : ॲड. सिद्धाराम पाटील (पराभूत : ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. अंजली बाबरे, ॲड. नरेंद्रकुमार गावडे, ॲड. मंगेश कंदलगावकर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT