सारंगी महाजन राजकारणात ?  sakal news
महाराष्ट्र बातम्या

सारंगी महाजन राजकारणात ?

ज्येष्ठ भाजप नेते स्व.प्रमोद महाजन यांचे भाऊ आणि स्व.प्रवीण महाजन यांच्या विधवा सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते स्व.प्रमोद महाजन यांचे भाऊ आणि स्व.प्रवीण महाजन यांच्या विधवा सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता आहे. आज त्यांनी एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मला राजकारणाची अलर्जी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे येथे रहाणाऱ्या महाजन यांच्या संपर्कात कोणता पक्ष आहे का ? त्या महापालिकेच्या रिंगणात उतरणार का असे प्रश्न आहेत.

सारंगी महाजन यांनी सांगितले की, "प्रमोद महाजन मला वडिलांसारखे होते. मात्र प्रवीण महाजन यांच्यावर खटला सुरु होता त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते अकारण त्रास देत असत. मला आणि माझ्या मुलांना त्या काळात काही झाले असते तर महाजन मुंडे कुटुंबीय जबाबदार ठरले असते असे मी तेंव्हा म्हटलं होते. आता कुटुंबातले तणाव जरा हलके झाले आहेत."

सारंगी महाजन कोण आहेत?

सारंगी महाजन या प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. जेष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांची प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी ठाण्याच्या तुरुंगात शिक्षा भोगताना प्रवीण महाजन यांचा २०१५ साली मृत्यू झाला होता. दरम्यान, सारंगी महाजन कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT