Sarkarnama Open Mic Season -2 
महाराष्ट्र बातम्या

Video: 'जसं काही भातखळकरांचा हा व्हिडीओ मोदीजी पाहणार', सत्यजीत तांबेंनी पकडली घाई अन्...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघत आहे. परस्परांबद्दल कमालीचा द्वेष वाढत आहे. या द्वेषाच्या राजकारणाला दूर करून निकोप राजकीय वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विविध पक्षातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून एक अगळावेळा कार्यक्रम ‘सरकारनामा’ने नुकताच आयोजित केला. या कार्यक्रमात राजकीय नेते पक्षीय मतभेद विसरुन हास्यकळ्ळोळात रंगले. (Sarkarnama Open Mic Season -2)

‘सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर, काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या. मुंबईतील हॉटेल लॉर्ड ऑफ ड्रिंक्स हे व्हेन्यू पार्टनर होते.

या कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली आणि हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेते या कार्यक्रमात रंगून गेले.

कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, 'काढा डिटेक्टर' यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी योग्य दिले की नाही हे ठरवण्याची जबाबदारी इतर नेत्यांवरच होती. ते त्यांच्या उत्तराशी सहमत नसतील तर तीन वेळा घंडी वाजवायची, असे सांगितले होते. नेत्याने दिलेल्या उत्तराशी इतर जण सहमत असतील तर त्यांना ज्यूस मिळणार होता. मात्र, जर इतर नेते सहमत नसतील तर त्यांना काढा मिळणार होता. यामध्ये अनेकांना काढा मिळाला. यामध्ये सत्यजीत तांबे यांना एकदाच काढा मिळाला, तर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना तीन वेळा आणि दिपाली सय्यद यांना दोन वेळा काढा मिळाला.

दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच ‘इकडचा डॉन’, या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. त्यामध्ये संदीप देशपांडे यांनी मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांची कोंडी केली. तर अभिनयात प्राविण्य मिळवलेल्या दिपाली सय्यद राजकारणात तशा नवख्याच आहेत, त्यांना प्रश्न विचारुन इतर नेत्यांनी चांगलेच भांडावून सोडले. दोन प्रश्नावर भाषणात तरबेज असलेल्या अमोल मिटकरी अडखळले.

तिसरा राऊंड होता 'करेक्ट कार्यक्रम' उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते. यामध्ये शिवसेनेच्या कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ‘ट्रोल’ केले. अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदेंना चांगलेच टोले लगावले, अशा बिगर राजकीय कार्यक्रमात नेत्यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT