Satara News Crime
महाराष्ट्र बातम्या

Satara News : गोळीबार प्रकरणी ठाण्याचा माजी नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक मदन कदम यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्यातून मोठी घटना समोर आली आहे. पाटण तालुक्यातील गुरेघर येथे रविवारी झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. तर एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी ठाण्याचा माजी नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक मदन कदम यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबाराची घटना घडली आहे. जून्या वादातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कदम हे मुळचे पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील आहेत.

अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

या घटनेत ठार झालेल्यामध्ये श्रीरंग लक्ष्मण जाधव आणि सतीश बाळासाहेब जाधव अशी मृतांची नाव आहेत. जुना वाद मिटवण्याची चर्चा सुरू असताना पुन्हा वादावादी झाली आणि त्यातच रागाच्या भरात मदन कदमने गोळीबार केला असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (19 मार्च) रात्री ही घटना घडली. पवनचक्कीच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

जुना वाद मिटवण्यासाठी बोलणी सुरू असताना पुन्हा वादाचा भडका उडाला आणि रागाच्या भरात मदन कदम याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पाटण तालुक्यात तणाव निर्माण झाला. मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT