Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam : मोठा दिलासा! कोयना धरण आलं भरत, धरणात 'इतका' TMC पाणीसाठा तर महाबळेश्वरला 110 मिलिमीटर पाऊस

कोयनानगर १३२ मिलिमीटर, नवजाला १७० मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ११० मिलिमीटर पावसाची नोंद

सकाळ डिजिटल टीम

गेल्या सात-आठ दिवसांपासून कोयना क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळल्याने येथील नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सकाळी पावसानं थोडी उघडझाप केली होती. मात्र, पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला आहे.

कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ७६.५९ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद २२ हजार ६७८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १३२ मिलिमीटर, नवजाला १७० मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कोयना क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळल्याने येथील नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT