satbara sakal
महाराष्ट्र बातम्या

सातबारा उतारा होणार बिनचूक; ४६ प्रकारच्या त्रुटी केल्या दूर

नावात चुका, चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या सातबारातील त्रूटी दूर करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नावात चुका, चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या सातबारातील त्रूटी दूर करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

पुणे - सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षात जागेवरील क्षेत्रात तफावत, कब्जेदार सदरी असलेल्या नावात चुका, चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या सातबारातील त्रूटी दूर करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. त्यामुळे राज्यातील सातबारा उतारा बिनचूक करण्याचे काम ९९.५५ टक्के पूर्ण झाले आहे.

राज्य सरकार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ई-फेरफार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातंर्गत राज्यातील २ कोटी ५४ लाख सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात येत आहे. राज्यात प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत वेगवेगळी होती. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या होत्या. अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती स्पष्ट झाल्या होत्या. २०१८ पासून सातबारा उतारा बिनचूक करण्याच्या कामाला सुरूवात झाली.

जवळपास ९८.५० टक्के सातबारा उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीचे काम मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून काम करण्यात येत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे हे काम थांबले होते. मात्र त्यानंतर तातडीने हे दुरुस्तीचे काम महसूल विभागाकडून हाती घेण्यात आले. त्यामध्ये आता २ कोटी ५४ लाख सातबारा उताऱ्यांपैकी केवळ ४६ हजार सातबारा उताऱ्यांमध्ये दुरुस्तीचे काम राहिले आहे. त्यामुळे जवळपास ९९.५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ते देखील लवकरच मार्गी लागले, असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गेल्या शंभर वर्षात सातबारा उताऱ्यातील त्रुटी दूर करण्यात आल्या नव्हत्या. महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बिनचूक सातबारा उताऱ्याचे काम करून महसूल विभागाने नवा इतिहास रचला आहे.

अचूक सातबारा उताऱ्यांसाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले. त्यामुळे राज्यातील ९९.५५ टक्के सातबारा उतारे बिनचूक झाले आहेत. उर्वरित सातबारा उतारे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच शंभर टक्के बिनचूक सातबारा उताऱ्यांचे काम होईल.

- रामदास जगताप, माजी समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

ई-फेरफार प्रकल्प दृष्टिक्षेपात...

  • राज्यात एकूण सातबारा उतारे- २ कोटी ५४ लाख

  • पुणे जिल्ह्यातील एकूण सातबारा उतारे - १४ लाख ९२ हजार ४४५

  • त्यापैकी विसंगती आणि त्रुटी असलेले सातबारा उतारे- २६ हजार ९००

  • त्यापैकी क्षेत्रामध्ये तफावत असलेल्या सातबारा उताऱ्यांची संख्या- १६ हजार ४५५

  • बिनचूक सातबारा उताऱ्यांचे काम ९९.५५ टक्के पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT