Satej Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

अँटेलिया स्फोटकाचा मास्टर माईंड परमबीर सिंगच; सतेज पाटील

महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न ; सतेज पाटील

सकाळ डिजिटल टीम

पणजी: सध्या पाच राज्यातील निवडणूका जवळ आल्या आहेत. उमेदवारांचे प्रचार सुरु आहेत. या प्रचारात आरोप- प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. गोव्यातील विधानसभा निवडणुक (Goa Assembly Elections) काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलेल्या सतेज पाटील (Satej Patil)यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्यावर मत व्यक्त केले. यात त्यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया स्फोटके प्रकरणाचा मास्टर माईंड दुसरे तिसरे कोणी नसून, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगच आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

सचिन वाझेला (Sachin Waze) सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा माझ्यावर दबाव होता. त्यामुळेच मी वाझेला सेवेत घेतले, असा दावा परमबीर सिंग यांनी ईडीसमोर केला आहे. महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. अशी टीका ही सतेज पाटील यांनी केली.

सतेज पाटील म्हणाले, ईडीने आता खुलासा केला पाहिजे. हे सर्व पूर्वनियोजितपणे केले जात आहे. बातम्या पद्धतशीरपणे पेरल्या जात आहेत. या बातम्या खर्‍या आहेत की खोट्या आहेत हे ईडीने सांगावे असे मत पणजीत पाटील यांनी व्यक्त केले. ज्यावेळी सत्य बाहेर येईल, तेव्हा परमबीरसिंग यांना सर्व आरोप खोटे असल्याचे समजेल. कोणत्याही पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या या ठरलेल्या प्रक्रियेनुसारच केल्या जातात. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरच पोलीस अधिकार्‍याच्या बदल्या होत असतात. असे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT